मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी देशात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही. मग कोणत्याही विदेशी नेत्याच्या दौऱ्यात फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते, असा सवाल राष्ट्रवादीनं मोदी सरकारला केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. ते गुजरातमधील अहमदाबादला भेट देणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेतील झोपड्यांसमोर भिंती उभारल्या जात आहेत. या मुद्द्यावरून या मुद्द्यावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील सरकारवर टीका केली होती. तर, ७० लाख लोक स्वागतासाठी उभे राहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे काय भगवान राम आहेत का?, असा संतप्त सवाल काँग्रेसनं उपस्थित केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली आहे.

नरेंद्र मोदी नेमके देशाचे पंतप्रधान आहेत की, गुजरातचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आतापर्यंत १५ देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी गुजरात आणि अहमदाबादचा दौरा केला आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारतात येत आहेत. त्यांनाही अहमदाबादला घेऊन जाणार आहेत. या दौऱ्यासाठी अहमदाबाद येथे अवास्तव खर्च केला जात आहे, याकडेही राष्ट्रवादीनं लक्ष वेधलं आहे.

अहमदाबादमधील गरिबी झाकण्यासाठी भिंती बांधून रस्त्यातील झोपड्या लपवण्याची तयारी झाली आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही, मग कोणत्याही विदेशी नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते, असा सवालही राष्ट्रवादीनं केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here