बीजिंग: श्रीलंका, मालदीवनंतर आता आणखी एक देश चीनच्या सावकारी पाशात अडकत चालला आहे. ‘बेल्ट अॅण्ड रोड’ या प्रकल्पाच्या कामासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात हा देश असमर्थ ठरत असल्याचे समोर आले आहे. युरोपमधील मोंटेनेग्रो हा लहानसा देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. मोटेंनेग्रोने एक अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते.

मोटेंनेग्रो देशाने बेल्ट अॅण्ड रोड प्रकल्पासाठी कर्ज घेतले. मात्र, ज्या महामार्गासाठी कर्ज घेतले, त्याचेही काम अद्याप पूर्ण झाले नाही. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पातंर्गत महामार्गाचे काम चीनची सरकारी कंपनी चायना रोड अॅण्ड ब्रिज कॉर्पोरेशनकडून करण्यात येत आहे. या कामासाठी चीनमधून कामगार बोलावण्यात आले आहे. या चिनी कंपनीने आतापर्यंत २७० मैल महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील सर्बियातील बेलग्रेडपर्यंत आपले काम पूर्ण केले नाही. या महिन्यातच मोंटेनेग्राला एक अब्ज डॉलरचा पहिला हफ्ता चीनच्या सरकारी बँकेला द्यायचा आहे. मात्र, मोंटेनेग्रा हा कर्ज कसे फेडणार हे स्पष्ट झाले नाही.

वाचा:
मोंटेनेग्रा देशावर त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) दुप्पट कर्ज आहे. चीनसोबत झालेल्या कराराच्या अटीनुसार जर मोटेंनेग्रा कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यास चीनच्या त्यांच्या देशातील बंदरे, जमिनीचा ताबा घेऊ शकतो. त्याशिवाय या कराराबाबत काही समस्या उद्भवल्यास चीनमधील कोर्टात याची सुनावणी होईल यावर मोटेंनेग्रा सरकारने सहमती दर्शवली.

वाचा:
चीनद्वारे युरोपमध्ये सुरू असलेल्या बेल्ट अॅण्ड रोड प्रकल्पाच्या मुद्यावरून युरोपमध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत. युरोपमध्येही चीन आपला प्रभाव वाढवत असल्याचे त्यांनी म्हटले जात आहे. चीनने आपल्या महत्त्वकांक्षी ‘बेल्ट अॅण्ड रोड’ प्रकल्पाच्या योजनेतून आशिया आणि आफ्रिकेतील गरीब देशांना कर्जाच्या विळख्यात अडकवले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here