म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून आईचा क्रुरपणे खून करुन शरीरातील अवयव भाजून खाण्याच्या तयारीत असलेला कोल्हापुरातील आरोपी सुनील रामा कुचकुरवी याला जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना कोल्हापूर शहरात चार वर्षांपूर्वी घडली होती. गेल्या आठवड्यात आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

या खटल्याची हकीकत अशी की, २८ ऑगस्ट २०१७ राजी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माकडवाला वसाहतीत आरोपी सुनील कुचकोरवी याने आई यल्लवा रामा कुचकोरवी (वय ६२, रा. माकडवाला वसाहत) हिचा खून केला. दारु पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरुन आईचा खून केला. चाकू, सुरी आणि सत्तूर या हत्यारांनी आईच्या अंगावर ठिकाठिकाणी वार केले होते. शरीराचे तुकडे करून ते भाजून खाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या या घटनेने तेव्हा तीव्र संताप व्यक्त केला होता. या व्यक्तीस वकील देऊ नये अशी मागणीही करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास तत्कालिन शाहूपुरी पोलिस निरीक्षक एस.एस. मोरे यांनी केला. त्यानंतर दोषारोपपत्र कोर्टात पाठवण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा कोर्टात जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर झाली. सरकारी वकील अॅड विवेक शुक्ल यांनी १२ साक्षीदार तपासले. खुनाच्या गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितिजन्य पुराव्यावरुन कोर्टाने आरोपीस दोषी ठरवले. आरोपीविरुद्ध झालेल्या तक्रारी, हायकोर्टातील दाखल केलेले दाखले तसेच सदर गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरुपाचा आहे.

या गुन्ह्यात आईचा अनामुषपणे खून केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ खाली दोषी ठरवुन मरेपर्यंत फाशी शिक्षा सुनावली. तसेच २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. खटल्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एम. नाईक, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश परीट, श्री लोहार यांचे सहकार्य लाभले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here