मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत. राजकीय हेतूनं मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही खडसेंची बाजू घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (, Slams BJP)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी खडसेंच्या संबंधीच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्यावर ज्या प्रकरणी कारवाई सुरू आहे, त्यात अद्याप कोणतेही तथ्य आढळलेले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली होती, त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. असं असतानाही कुभांड रचून केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत त्यांना राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

वाचा:

‘भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिलं गेलं नाही. ओबीसी नेतृत्व असल्यानं त्यांना बाजूला करण्यात आलं. आता त्यांना राष्ट्रवादीत सन्मानानं प्रवेश दिल्यानं चिडून जाऊन केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. खडसेंना चुकीच्या पद्धतीनं अडकवत आहे. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं चौकशीतून ते बाहेर येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पूर्ण सहकार्य करणार!

खडसे यांनी मात्र ईडीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. ‘यात राजकारण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याआधी तब्बल पाच वेळा माझी चौकशी करण्यात आली आहे. एसीबीनंही यासंबंधी अहवाल दिला आहे. तरीही आता पुन्हा चौकशी होतेय,’ असं खडसे म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here