वाचा:
नाशिक महापालिकेच्या ग्रीन बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते शहरात आले होते. या कार्यक्रमांनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीविषयी देखील त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट काही बोलणं टाळलं. मात्र, भाजपवरील आरोप खोडून काढले. ‘खडसे यांच्या चौकशीच्या प्रकरणात मी काय बोलणार? जे काही सांगायचं आहे, ते ईडीकडून सांगितलं जाईल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सूड भावनेनं काम करण्याची कुठलीही प्रथा नाही,’ असं ते म्हणाले.
वाचा:
राज्यात भाजपला दूर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेनं सरकार स्थापन केल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक नेत्यांच्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत. काहींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यात अनिल देशमुख, एकनाथ खडसे व त्यांचे जावई, प्रताप सरनाईक व त्यांची दोन मुले, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा समावेश आहे. याशिवाय, अजित पवार यांच्या नातेवाईकांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता सील करण्यात आली आहे. चौकशी सुरू असलेले जवळपास सर्वच लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. साहजिकच भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. खडसेंशी संंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी आज हा आरोप अमान्य केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times