कोलंबो : भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेला सुरवात होण्याअगोदर ही मालिका रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मालिकेपूर्वी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक यांना कोरोनाची लागण झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरून परतलेला श्रीलंकेचा संघ सध्या क्वॉरंटाईनमध्ये आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात येताच त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाचा-

भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधीच श्रीलंकेच्या गोटात कोरोनाने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आली आहे. तर इतर खेळाडूंना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचा-

श्रीलंकेचा संघ नुकताच मर्यादित षटकांची मालिका खेळून इंग्लंडहून परतला आहे. मालिकेच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लंडच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. तसेच 4 सपोर्ट स्टाफचाही कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली. तसेच मायदेशी परतल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंना क्वॉरंटाईन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वाचा-

इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर निवड समितीने 18 सदस्यांचा स्वतंत्र संघ जाहीर केला होता. पाकिस्तानविरुद्ध संघाला तीन एकदिवसीय सामने आणि तेवढेच टी-20 सामने खेळायचे आहेत. या संघाचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे देण्यात आले असून संघात 9 नवीन खेळाडूंची भर पडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here