मुंबईः ‘डॉ. (Bhagwat Karad) हे राज्यमंत्री झाले. (Pankaja Munde) यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेल. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केले काय,’ अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबरोबरच फेरबदल करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्रातील चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मंत्रिमंडळातील या फेरबदलावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केलं आहे.

‘एक तर नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्याला लागलेले ओंडकेच आहेत. भारतीय जनता पक्षाचा किंवा ‘एनडीए’चा गाभा मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोठेच दिसत नाही, पण सरकार चालविण्याची क्षमता असलेल्या लोकांची निवड पंतप्रधानांनी पारखूनच केली असणार,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचाः

‘महाराष्ट्रातून अखेर नारायण राणेंची मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मुळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असं वाटलं होतं. पण लघु, मध्यम व उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्रीही नाहीत. समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

वाचाः

‘डॉ. भारती पवार व कपिल पाटील हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे,’ असा टोमणाही शिवसेनेनं मारला आहे.

‘केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्तारा आधी केंद्र सरकारने एक सहकार खाते निर्माण केले. सहकार हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय पण आता केंद्र त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरु नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळं करणार काय?,’ असा सवाल यावेळी शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here