नवी दिल्ली : केरळमध्ये करोना विषाणू संक्रमण अद्यापही चिंताजनक स्थितीमध्ये असतानाच केरळवर आणखी एका विषाणूची वक्रदृष्टी पडलीय. केरळमध्ये झिका विषाणूचा आढळलाय. केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक २४ वर्षीय गर्भवती महिला संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे फैलावणाऱ्या झिका विषाणूचं संक्रमण देशात पहिल्यांदाच समोर आलंय.

तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी १३ संशयित रुग्ण असल्याचं समोर येतंय. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला धाडण्यात आले आहे. चाचणीचे निकाल आल्यानंतर संक्रमणाची पुष्टी केली जाऊ शकेल, अशीही माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिलीय.

झिका विषाणू संक्रमित आढळलेल्या गर्भवती महिलेनं गेल्या ७ जुलै रोजी आपल्या मुलाला जन्म दिला. या बाळामध्येही आढळून आलंय. महिलेला २८ जून रोजी ताप, डोकेदुखी तसंच शरीरावर लाल डाग आढळल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत महिला झिका विषाणू संक्रमित असल्याचं समोर आलं. त्यानंतर चाचणीचे नमुने चाचणीसाठी एनआयव्ही, पुण्याला धाडण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. उल्लेखनीय म्हणजे, या गर्भवती महिलेनं गेले अनेक महिने राज्यातून बाहेर प्रवास केलेला नाही.

झिका विषाणू संक्रमणाची लक्षणं?
झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असतात. यामध्ये ताप, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसंच डोळे लाल होणं अशी अनेक लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात.

झिका विषाणू संक्रमित व्यक्तीमध्ये सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका आहे. यामुळे जन्माला येणारं मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here