अकोला: शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रिधोरा येथील रिलायन्सच्या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकला भीषण अपघात झाला आहे. त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. (Truck-Car Collision on National Highway Near Akola)

काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कार (एम एच 37 G 8262 ) शेगावहून ही कार वाशिमच्या दिशेनं जात होती. या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकनं दोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी आहेत. पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here