मुंबईः करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना लसीकरण मोहिमेला (corona vaccination drive)गती देण्याची गरज आहे. मात्र, आज मुंबई, ठाणे परिसरात पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागला आहे. करोनावरील लशींचा साठा उपलब्ध नसल्यानं आज पालिका- सरकारी केंद्रावर लसीकरण होणार नसल्याचं मुंबई महानगरपालिकेनं (BMC) स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारकडून लशींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यानं मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसंच, लससाठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे व भिवंडी शहरातही लसीचा तुटवडा असल्यानं आज लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.

ठाण्यात लसीकरण बंद

ठाण्यातील मागणीच्या तुलनेत येणाऱ्या लशींचे प्रमाण कमी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा लसीकरण बंद करण्याची वेळ ठाणे महापालिकेवर ओढावली आहे. ५ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यासाठी ६० हजार लशी आल्या होत्या. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या पदरी केवळ १३ हजार २०० लशी आल्या. परंतु गेल्या दोन दिवसांत मागणी करूनही लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम थांबवावी लागली आहे.

वाचाः

भिवंडीत लस संपली

लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ भिवंडी निजामपूर महापालिका प्रशासनावर आली. लस उपलब्ध नसल्याने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील खुदाबक्श हॉल, महापालिका शाळा क्रमांक ७५ भाग्यनगर, मिल्लतनगर नागरी आरोग्य केंद्र, महापालिका शाळा क्रमांक ८५ नवीवस्ती नागरी आरोग्य केंद्र, ईदगाह रोड नागरी आरोग्य केंद्र ही पाचही लसीकरण केंद्रे पुढील सूचना मिळेपर्यंत गुरुवारपासून बंद राहतील, अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. यापूर्वीदेखील अनेकदा लशीअभावी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली होती.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here