मुंबईः करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यावेळी दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळेवरही बंधने आली होती. संध्याकाळी चारपर्यंतच दुकानं सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली असली तरीही काही भागांत सर्रास दुकानं सुरू ठेवली जात आहेत. यावरुन मनसेनं राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबईत सध्या तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध लागू आहेत. त्यानुसार मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर वेळेची मर्यादा आहे. सकाळी सात ते चार पर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी दर्शवली होती. तसंच, इतर राजकीय पक्षांनीही यावर आक्षेप घेतला होता. नेते यांनी मात्र राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संध्याकाळी चार नंतरही मुंबईतील दुकानं सर्रास सुरू ठेवली जातात व दुकानदारांकडून वसुली केली जात असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

वाचाः

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मुंबईतल्या एका परिसरात दुकानं सुरू असल्याचं दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कोणत्या वेळी चित्रीत केलाय याची माहिती मिळू शकली नाहीये. दुकानांतील वेळेच्या मर्यादेवरुन संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका करत राज्य सरकारवर एक आरोप केला आहे. ‘आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून,’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. ‘मुंबईत करोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू आहे. संध्याकाळी चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान ५ हजार, मध्यम दुकान दोन हजार आणि छोटे दुकान एक हजार असे वसुलीचे नवे रेट कार्ड,’ असा टोला संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here