‘सरकारबरोबर चर्चा झाल्यानंतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी २१ दिवसांची मुदत मागितली होती. तरीही आम्ही एक महिन्याची मुदत देत आंदोलन स्थगित केले. ही मुदत आता संपत आली आहे. पण एवढ्या दिवसात सारथी वगळता इतर कोणत्याच मागण्या बाबत पूर्तता होताना दिसत नाही. मागण्या मान्य झाल्या. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्यामुळे आता पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे,’ असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.
वाचाः
‘एक महिन्याची मुदत दिली होती. आणखी पंधरा दिवस वाट पाहू. पण त्यापेक्षा अधिक वाट पाहणार नाही. आमच्यापुढे मूक आंदोलनाचा पर्याय खुला आहे. त्यासाठी रस्त्यावरच उतरण्याची गरज नाही. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता समाज बोलणार नाही. लोकप्रतिनिधींनी बोलायचे आहे,’ असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
वाचाः
‘मी शांत आहे. सारखं तलवार काढून उपयोग नाही. कधी आक्रमक व्हायचे हे मला चांगले माहीत आहे. म्हणून दिलेल्या मुदतीत सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास आक्रमक व्हावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान १४ जुलै रोजी सारथी बाबत महत्वाची बैठक सरकारने बोलवले,’ असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times