मुंबई: ‘राजकीय पुनर्वसन हा शब्दच मला मान्य नाही. मी काही पूरग्रस्त नाही. माझं घर वाहून गेलेलं नाही किंवा मी आश्रितही नाही,’ अशी रोखठोक भूमिका नेत्या () यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना आज मांडली.

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकताच अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व बीडमध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या () यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कराव्या लागलेल्या व विधान परिषदेवरही संधी न मिळालेल्या पंकजा यांची नाराजी प्रीतम यांना मंत्रिपद देऊन दूर केली जाईल, असंही बोललं जात होतं. मात्र, प्रीतम यांना संधी मिळाली नाही.

वाचा:

हाच धागा पकडून आज झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा यांना राजकीय पुनर्वसनाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हा प्रश्नच गैरलागू असल्याचं म्हलं. ‘पुनर्वसन हा शब्दच मला मान्य नाही. पुनर्वसन कोणाचं केलं जातं, जो बरबाद झालाय. ज्याचं सगळं वाहून गेलंय. माझ्या बाबतीत तसं काहीही झालेलं नाही,’ असं पंकजा म्हणाल्या.

पक्षातील मूळ लोकांना बाजूला करून बाहेरून आलेल्यांना पदं दिली जात आहेत याविषयी विचारलं असता, बाहेरून आलेल्या लोकांमुळं पक्षाला फायदा होतोय असं पक्षाला वाटत असेल. तसा पक्षातील नेत्यांचा अनुभव असेल. तसं असेल तर चांगलं आहे. नव्या मंत्र्यांना मी स्वत: शुभेच्छा दिल्या आहेत. कोणीही मोठं झालं तर त्याच्यापुढं लहान वाटावं इतक्या कोत्या मनाचे आम्ही नाही. पक्षामध्ये जे नवीन आलेत त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालंय त्यांचंही स्वागत आहे आणि या नव्या लोकांमुळं भाजपचं एक मतही वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे,’ असं पंकजा म्हणाल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here