मुंबई : शहरात ३ महिने वयाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात ( Murder Case) धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलगी झाल्यावर पैसे, नारळ आणि साडी न दिल्यामुळे रागावलेल्या तृतीयपंथीयांनी या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. कफ परेड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर खाडीच्या पाण्यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या आई-वडिलांनी पैसे, नारळ आणि साडी या मागण्यांची पूर्तता न केल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून मुलीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कलम ३०२ सह खुनाशी संबंधित इतर कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. तसंच पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here