पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने पशुपती पारस हे लोक जनशक्ती पक्षाचे सदस्य नाहीत, असं चिराग पासवान यांनी याचिकेत म्हटलं होतं. केंद्रीय मंत्री असलेले काका पशुपती कुमार पारस यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली होती. लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला चिराग पासवान यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणी कोर्टात सुनवणी झाली. कोर्टाने निर्णय देत चिराग पासवान यांची याचिकाच फेटाळून लावली.
याचिकेवर कोर्टात काय झालं?
लोकसभा अध्यक्ष या प्रकरणी लक्ष घालत आहे. यामुळे या याचिकेवर सुनावणी करण्यास काहीही अर्थ नाही. तसंच सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचंही उदाहरण लोकसभा अध्यक्षांचे वकीलांनी दिल्ली हायकोर्टात दिलं. तर चिराग यांच्या वकिलांनी लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेला कुठलाही विरोध केला नाही. तर पशुपती कुमार पारस यांच्या वकीलांनी त्यांची बाजू मांडली. पारस यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले त्यावेळी ते पक्षाचे मुख्य व्हिप होते. नंतर ते पक्षाचे प्रमुख म्हणून निवडले गेले, असं पारस यांचे वकील म्हणाले. तुम्ही या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे दाद मागायला हवी. हायकोर्टात येण्याची गरज नव्हती. ही याचिका सुनावणी योग्य नाही, असं हायकोर्टाने सर्वांची बाजू ऐकून घेत स्पष्ट केलं.
( चिराग पावसवान यांचे काका पशुपती कुमार पारस केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताना )
काय आहे काका-पुण्यातील वाद?
केंद्रीय मंत्री अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस हे लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे बंधू आहेत. पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यास विरोध केला आहे. आपण पक्षाचे अध्यक्ष असल्याचं चिराग पासवान यांचं म्हणणं आहे. यामुळे लोक जनशक्ती पक्षात पशुपती कुमार पारस यांचा एक गट आणि चिराग पासवान गट असे दोन गट पडले आहेत. तर आपणच रामविलास पासवान यांचे खरे राजकीय उत्तराधिकारी असल्याचं पशुपती कुमार पारस यांचं म्हणणं आहे. रामविलास पासवान यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांची जागा रिक्त झाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या विस्तारात पशुपती कुमार पारस यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं. याला पुतण्या चिराग पासवान यांचा विरोध आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times