वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान योजनेची (पीएमव्हीव्हीवाय) मुदत येत्या ३१ मार्चला संपुष्टात येत आहे. ही एक तात्कालिक अॅन्युइटी एलआयसी पेन्शन योजना असून, तिच्या माध्यमातून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळण्याची सुविधा मिळणार आहे. वयाची साठ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ नागरिकही योजनेत करू शकतात. त्यानंतर त्यांना १० वर्षांपर्यंत दरमहा १०,००० रुपयांचे नियमित उत्पन्न मिळणार आहे.

इमिडिएट अॅन्युइटी योजना म्हणजे काय?

इमिडिएट अॅन्युइटी योजना हा एक करार असून, त्या अंतर्गत इन्शुरन्स कंपनी ग्राहकाला (पेन्शनर) दरमहा ठरावीक रक्कम देण्यासाठी सहमती दर्शवते. पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर लगेचच दरमहा निर्धारित रक्कम मिळण्यास सुरुवात होते. या योजनेच्या अंतर्गत गुंतवणुकीची रक्कम दुप्पट करून १५ लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान वय वंदना योजनेंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन गुंतवणुकीसाठी एलआयसीच्या वेबसाइटवर आणि ऑफलाइन गुंतवणुकीसाठी एलआयसीच्या शाखेत जाणे आवश्यक आहे.

किती रक्कम जमा करावी?

या योजनेंतर्गत एकरकमी गुंतवणूक करावी लागते. ही रक्कम किमान १.५० लाख रुपयांपासून कमाल १५ लाख रुपयांपर्यंत कितीही असू शकते. संबंधित पेन्शनर व्यक्ती मिळणारी व्याजाची रक्कम पेन्शन वा एकरकमी स्वरूपात स्वीकारू शकते.

पेन्शन प्रकार किमान रक्कम कमाल रक्कम

वार्षिक ~ १,४४,५८८ ~ १४,४५,७८४

सहामाही ~ १,४७,६०१ ~ १४,७६,०१४

तिमाही ~ १,४९,०६८ ~ १४,९०,६८४

मासिक ~ १,५०,००० ~ १५,००,०००

८ ते ८.३० टक्के परतावा

‘पंतप्रधान वय वंदना योजनें’तर्गत जमा होणाऱ्या रकमेवर दर वर्षी ८ ते ८.३० टक्के दराने निश्चित परतावा मिळणार आहे. परताव्याची रक्कम गुंतवणूकदार मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक यापैकी कोणती योजना निवडतो, त्यावर आधारित आहे. दरमहा पेन्शन घेणाऱ्यांना ८ टक्के व्याज आणि वार्षिक पेन्शन घेणाऱ्यांना ८.३० टक्के दराने व्याज मिळणार आहे.

एक हजारांपासून ~१०,००० पर्यंत पेन्शन

‘पंतप्रधान वय वंदना योजना’ साठ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी आहे. या योजनेंतर्गत १० वर्षांपर्यंत आठ टक्क्यांच्या निश्चित व्याजदरासह पेन्शन मिळण्याची खात्री आहे. गुंतवणुकीची मर्यादा वाढल्यास ज्येष्ठ नागरिकांना दरमहा कमाल दहा हजार रुपये आणि किमान १००० रुपये मिळण्याची खात्री देण्यात आली आहे.

परताव्यांची निश्चित हमी

पेन्शनच्या स्वरूपात व्याजाची रक्कमच गुंतवणूकदाराला परत मिळते. त्यामुळे जर गुंतवणूकदाराने १५ लाख रुपये गुंतवले असतील तर ८ टक्के व्याजदराने त्यावर वर्षभराचे १,२०,००० रुपयांचे व्याज मिळेल. व्याजाची ही रक्कम दरमहा तत्त्वावर १०,००० रुपये, दर तिमाहीला ३०,००० रुपये आणि सहामाहीला ६०,००० रुपये आणि वर्षाकाठी घेतल्यास १,२०,००० रुपये मिळतील. मात्र, जमा रकमेवर व्याजदराचा आढावा केंद्र सरकार दर तिमाहीला करते. तिमाही अथवा सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शनचा पर्याय निवडताना गुंतवणूकदाराला १५,००,००० रुपये जमा करावे लागणार आहेत.

मॅच्युरिटी बेनिफिट

१० वर्षाच्या पॉलिसी कालावधीपर्यंत पेन्शनर जिवंत असल्यास जमा रकमेसह पेन्शनची रक्कम परत दिली जाते.

मृत्यू लाभ

पॉलिसी कालावधीच्या १० वर्षांच्या आत पेन्शनरचा मृत्यू झाल्यास जमा रक्कम परत केली जाते.

पेन्शनरने आत्महत्या केल्यास?

जमा झालेली रक्कम परत मि‌ळते.

पॉलिसीवर मिळते कर्ज

पंतप्रधान वय वंदना योजनेंतर्गत रक्कम जमा केल्यास तीन वर्षांनंतर त्यावर कर्ज घेतले जाऊ शकते. जेवढी रक्कम जमा केली जाते, त्याच्या ७५ टक्के कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची रकमेवर तिमाही व्याज आकारले जाते. कर्जाची रक्कम परत न केल्यास दर सहा महिन्यांचे व्याज द्यावे लागते. व्याजाची रक्कम मिळणाऱ्या पेन्शनमधून वजा केली जाते.

योजना करमुक्त आहे का?

योजनेवर जीएसटी द्यावा लागत नाही. मात्र, भविष्यात कर आकारला जाण्याची शक्यता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here