नवी दिल्ली : दिल्लीच्या बहुचर्चित निवडणुकीनं अनेकांना धक्के बसलेत. संपूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपला एकूण ७० जागांपैंकी ८ जागांवर विजय मिळू शकला. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं () इंग्रजी मुखपत्र असलेल्या ”मध्ये () दिल्ली निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्यात आलंय. यामध्ये दिल्ली निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना का करावा लागला? याची समिक्षा करण्यात आलीय. आरएसएसच्या एका लेखात भाजप, पक्षाचं दिल्ली यूनिट आणि निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांबद्दल विस्तृतपणे लिहिण्यात आलंय.

‘केवळ आपण ज्या पक्षाशी संबंधित आहोत तो पक्ष उत्कृष्ठ आहे म्हणून आपणंही योग्यच असल्याचा दावा एखादा खराब उमेदवार करू शकत नाही. एखादा दुष्ट केवळ दुष्टच असू शकतो’ असं म्हणतानाच ‘भाजप एक संस्था असल्यानं त्यांनी हे समजणं गरजेचं आहे की अमित शहा आणि नेहमीच मदत करू शकत नाहीत’ अशा कानपिचक्याही या लेखातून देण्यात आल्यात.

‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा नेहमीच विधानसभा स्तरावरच्या निवडणुकांतही मदत करू शकत नाहीत आणि दुसरा कोणताही पर्यात नाही. परंतु, दिल्लीत स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षाला नव्यानं तयारी करण्याची गरज आहे’ असंही या लेखात म्हटलं गेलंय. हा लेख संपादक प्रफुल्ल केतकर यांनी ‘Delhi’s Divergent Mandate’ या शीर्षकासह लिहिलाय.

पक्षानं शहर – राज्य मतदानातला फरक ओळखणं गरजेचं आहे. दिल्लीत ‘शाहीन बाग नरेटिव्ह’ भाजपसाठी फोल टरलं कारण अरविंद केजरीवाल यांची भूमिका या मुद्यावर स्पष्ट होती, असंही या लेखात म्हटलं गेलंय. केजरीवालांच्या ‘भगवा अवतार’वर प्रकाश टाकताना भाजपनं त्यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना वजा सल्लाही या लेखातून देण्यात आलाय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here