काबूल: इराणच्या सीमेवरील व्यूहरचनात्मक दृष्टीने महत्त्वाच्या इस्लामकाला या गावावर तालिबानने ताबा मिळवला आहे. यासह, अफगाणिस्तानातील ८५ टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानच्या म्होरक्यांनी केला आहे. इराणपासून चीनपर्यंतच्या सर्व सीमाभागावर ताबा मिळवला असल्याचेही या म्होरक्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यावर अफगाणिस्तान सरकार किंवा अन्य कोणाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केली असून, संपूर्ण सैन्य ३१ ऑगस्टपर्यंत माघारी येणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले. त्याचबरोबर आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यामध्ये शांतता चर्चा सुरू आहे. अंतिम तोडग्यापूर्वी जास्तीत जास्त भूभाग ताब्यात ठेवण्यासाठी तालिबानने हल्ले तीव्र केले आहेत. अफगाणिस्तानातील ३९८पैकी २५० जिल्हे नियंत्रणाखाली असल्याचे तालिबानच्या रशियातील शिष्टमंडळाने म्हटले आहे. तर, इस्लाम काला शहरावर ताबा मिळवल्याचे तालिबानचा म्होरक्या झबिहुल्ला मुजाहीद यांनी सांगितले. तर, या शहरात अद्याप संघर्ष सुरू असल्याचे अफगाणिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात आले.

वाचा:

वाचा:
३१ ऑगस्टपूर्वी सैन्यमाघारी

अफगाणिस्तानातील लक्ष्याची पूर्ती झाल्यानंतर २० वर्षांतील मोहीम थांबवत, ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेची मोहीम संपेल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केली. तर, अफगाणिस्तान सरकार संपूर्ण देशावर प्रभाव ठेवण्याची शक्यता सद्यस्थितीमध्ये दिसून येत नाही. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे, हा पर्याय असू शकत नाही. अमेरिकेच्या आणखी एका पिढीला मी अफगाणिस्तानातील युद्धामध्ये पाठवू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली.

वाचा: पाकिस्तानची क्षमता नाही

अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे, गृहयुद्ध टाळण्यासाठी सर्व पक्षांनी सत्तेतील भागीदारीच्या सूत्रावर सहमती करावी, असे आवाहन पाकिस्तानकडून शुक्रवारी करण्यात आले. सिनेटच्या स्थायी समितीसमोर परराष्ट्र व्यवहारावर माहिती देताना परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. अफगाणिस्तानातील सशस्त्र संघर्ष तीव्र झाला, तर येणाऱ्या स्थलांतरितांच्या लोंढ्याच्या समस्येला तोंड देण्याची पाकिस्तानची क्षमता नाही, असेही कुरेशी यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here