नारायण राणे यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले होते. आपल्याला शुभेच्छा देण्याएवढे मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही असे राणे यांनी म्हटले होते. त्यावर खासदार विनायक राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
नारायण राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार राऊत म्हणाले की, राणे यांचा शिवसेनेकडे आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही आणि याच गोष्टीचे दुःख वाटते, असे म्हणतानाच नारायण राणे यांना भाजपने सूक्ष्म उद्योग मंत्री करावे, अती वरिष्ठ मंत्री करावे किंवा थेट पंतप्रधान करावे, याचे शिवसेनेला दुःख वाटण्याचे कारण नाही, असे राऊत म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
काय म्हणाले होते नारायण राणे?
उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि नारायण राणे यांच्यासह राणेपुत्र खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात त्यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times