वॉशिंग्टन: सूर्याच्या पृष्ठभागावर तयार झालेले शक्तीशाली सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने येत आहे. या वादळाचा वेग १६ लाख ९ हजार ३४४ किमी प्रतितास इतका प्रचंड आहे. हे सौर वादळ रविवारी अथवा सोमवारी कोणत्याही क्षणी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. या सौर वादळामुळे सॅटेलाइट सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. यामुळे विमान उड्डाणे, रेडिओ सिग्नल, संपर्क यंत्रणा आणि हवामानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

स्पेसवेदर डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, या सौर वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील एका भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर अथवा दक्षिण अक्षांशावरील देशांतील नागरिकांना रात्री सुंदर अरोरा दिसू शकतो. आकाशात ध्रुव ताऱ्याजवळ रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या चमकत्या प्रकाशाला अरोरा म्हणतात.

वाचा:
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अंदाजानुसार, हे सौर वादळ १६ लाख ९ हजार ३४४ किमी प्रतितास इतक्या वेगाने येत आहे. यापेक्षाही अधिक वेग असण्याची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तवली. अंतराळात महावादळ आल्यास त्याचा परिणाम पृथ्वीवर होऊ शकतो. वीज गेल्याने अनेक शहरे अंधारात बुडण्याची शक्यता आहे.

वाचा: पृथ्वीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो?

सौर वादळामुळे पृथ्वीबाह्या वातावरण अधिक उष्ण होऊ शकते. त्याचा थेट परिणाम उपग्रहांवर होऊ शकतो. यामध्ये जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्हीच्या प्रसारण यंत्रणेत अडथळे निर्माण होऊ शकतो. विद्युत वाहिनीत प्रवाह अधिक होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर उडू शकतात. मात्र, अशी घटना फार क्वचितच घडत असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र अशावेळी सुरक्षा कवच म्हणून काम करते.

१९८९ मध्ये आलेल्या सौर वादळामुळे कॅनडातील क्युबेक शहर १२ तासांसाठी अंधारात बुडाले होते. त्यामुळे लाखो लोकांना त्रास झाला होता.

पाहा: वाचा: सौर वादळ म्हणजे काय?

सौर वादळ हे सूर्यावरील चुंबकीय क्षेत्रातील अनियमिततेमुळे तयार होणारे वादळ आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र जेव्हा जास्त शक्तीशाली होत असते तेव्हा सौर डागांची संख्या वाढते. मोठे झालेल्या डागाच्या ठिकाणी स्फोट होऊन सौरवादळांची निर्मिती होते. सौर वादळांचा प्रत्यक्षात मानवी शरीरावर परिणाम आढळत नाही. मात्र, उपग्रह यंत्रणा, वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here