पुणेः ‘काँग्रेसचे () हे राज्यातील पप्पू, केंद्रातही एक पप्पू आहेत. ते आपल्या मनाला येईल ते बोलत राहतात,’ अशी खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष () यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसनं भाजपवर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही ‘मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधान बदलायला हवेत,’ असं वक्तव्य केलं होतं. पटोले यांच्या या विधानावर चंद्रकांत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर, नाना पटोले यांना चंद्रकांत पाटलांनी थेट पप्पू असं म्हटल्यानं आता नवं वादळ उठण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांवर टीका

अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर संजय राऊतांनी शंका व्यक्त केली होती. त्यावरही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना सहकारातलं काय कळतं?, असा सवाल केला आहे. तसंच, साखर कारखान्यासाठी किती भांडवल लागतं. नफ्यातून कारखाना काय करु शकतो याची माहिती नाही. सहकार कशाशी खातात हेही राऊतांना माहिती नाही. सहकार खाते अमित शहांकडे गेल्यानं विरोधक धास्तावले आहे, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

वाचाः
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी राज्यातल्या साखर कारखान्यांबाबत अमित शहांना दिलेल्या पत्रात नितीन गडकरी यांच्या कारखान्याचे नाव होते. त्यावरुन भाजपचा गडकरींना संपवण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेवरही चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी सर्वच कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ती यादी मी नव्हे अण्णा हजारेंनी केली आहे. त्यामुळे त्यात नितीन गडकरींच्या कारखान्याचे नाव आले. मात्र, आपल्या कारखान्याविषयी गडकरींनी अनेक वेळा स्पष्टीकरण दिले आहे. ते पुन्हा देतील,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here