हे तिघेजण कर्जतजवळ असलेल्या पाली भूतवली धरणावर पोहोयला गेले होते. मात्र या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. ही तिन्ही मुले अल्पवयीन असून साहील हिरालाल त्रिभुके याचे वय १५ वर्षे, प्रीतम गौतम साहू याचे वय १२ वर्षे आणि मोहन साहू याचे वय १६ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे तिघे कुर्ल्यातील नौपाडा येथील नानीबाई चाळीत रहात होते.
क्लिक करा आणि वाचा-
रायगड जिल्ह्यातील आणि खालापूर तालुक्यातील धबधब्यांचे पर्यटकांमध्ये आकर्षम आहे. येथे दरवर्षी पर्यटक पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मात्र कर्जत आणि खालापूर तालुक्यातील धबधब्यांवर आणि धरणांवर पावसाळ्यात फिरण्यास बंदी घालणारे आदेश कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी काढले आहेत. येथे जाण्यास बंदी असतानाही ही मुले येथे पोहण्यासाठी गेली आणि आपले जीव गमावून बसली. या तीन मुलांच्या जाण्याने कुर्ला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times