मुंबई: डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार विरुद्ध राज्यव्यापी आंदोलन सुरू असून आज मुंबईतील मोर्चादरम्यान दुर्घटना घडली. मोर्चातील बैलगाडी मोडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी खाली कोसळले. या दुर्घटनेत काही जणांना किरकोळ इजा झाली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाजपने यावर तीरकस शब्दांत निशाणा साधला आहे. ( )

वाचा:

पेट्रोल डिझेल दरवाढीविरुद्ध मुंबईत अँटॉप हिल येथील भरणी नाका भागात आज सकाळी काँग्रेसने काढला होता. बैलगाडीवर भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उभे होते. अधिक भारामुळे अचानक बैलगाडी तुटली आणि जगताप यांच्यासह बैलगाडीतील सर्वजण खाली कोसळले. यात जगताप यांना कोणतीही इजा झाली नाही मात्र काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतरही काँग्रेसची निदर्शने सुरू होती.

वाचा:

अशी घडली दुर्घटना…

बैलगाडीवर भाई जगताप सर्वात पुढे होते. त्यांच्यासोबत जवळपास डझनभर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैलगाडीवर उभे होते. या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्याचदरम्यान, एक कार्यकर्ता जगताप यांच्याकडे सिलेंडर देत असतानाच बैलगाडी तुटली आणि बैलगाडीवरील सर्वजण खाली कोसळले. त्यामुळे काहीशी घबराट पसरली मात्र कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. याआधीही राजकीय कार्यक्रम वा आंदोलनात अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी बैलगाडीवर गर्दी केल्याने क्षमतेपेक्षा जास्त वजन होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

राज्याच्या राजकारणातही असंच होईल…

काँग्रेसच्या मोर्चातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधी पक्ष भाजपने यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाई जगताप यांना टॅग करत एक खोचक ट्वीट केले आहे. ‘तोल सांभाळा भाई जगताप. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळलेत तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा’, अशी टोलेबाजी उपाध्ये यांनी केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here