: नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला सुनावण्यात आलीय. या तरुणीचं नाव असं आहे. उल्लेखनीय म्हणजे, ” (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार यांच्यासमोर अमूल्यानं या घोषणा दिल्या.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गुरुवारी, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमूल्या हिला ताब्यात घेतलं. त्यानंतर अमूल्या हिला बंगळुरूच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंचावर असताना अमूल्यानं मंचावर दाखल होत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यामुळे क्षणभर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत सभेचे आयोजकही गोंधळून गेले. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली. ‘शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडलं ते चुकीचंच होतं’ असं म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली. दरम्यान, अमूल्याच्या वडिलांनीही आपल्या मुलीचं कृत्य चुकीचंच होतं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here