म. टा. प्रतिनिधी,

पद मिळाल्यानंतर आनंदोत्सव हा ठरलेला. गुलालाची उधळण, साखर पेढे वाटप करत हा आनंदोत्सव साजरा होतो. राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या तालुक्यात असाच आनंदोत्सव साजरा करताना चक्क जेसीबीमधून गुलाल उधळण्यात आला. गावभर फिरत उधळलेल्या या गुलालाने बानगे गाव सध्या कोल्हापूर चर्चेत आले आहे. निमित्त होते पंचायत समिती पदाधिकारी निवडीचे. (gulal thrown into the village in by jcb)

कागल तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड झाली. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे रमेश तोडकर सभापती तर शिवसेनेच्या मनिषा संग्राम सावंत यांची बिनविरोध निवड झाली. तोडकर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे तर सावंत माजी आमदार संजय घाटगे गटाचे. चार वर्षापासून या पंचायत समितीत मुश्रीफ व घाटगे गटाची आघाडी आहे. म्हणजे राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच कागल तालुक्यात ती स्थापन करण्यात आली होती.
कागलची ओळख महाराष्ट्राचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. या तालुक्यात मंडलिक, मुश्रीफ, राजे व घाटगे असे चार गट आहेत. येथे पक्षाला फारसे महत्त्व नसते. प्रत्येक माणसांवर गटाचा शिक्का आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पंचायत समितीत एकत्र असलेले मुश्रीफ व घाटगे गट नुकत्याच झालेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत एकमेकांसमारे उभे ठाकले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुश्रीफांचे सुपूत्र नाविद व घाटगेंचे सुपूत्र अंबरिष हे दोन वेगवेगळ्या आघाडीतून निवडणून आले.

क्लिक करा आणि वाचा-
ही सर्व पार्श्वभूमी असताना पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली. त्यामध्ये बानगे येथील सावंत यांच्या गळ्यात उपसभापतीची माळ पडली. घरात प्रथमच पद आल्याने सावंत कुटुंबियांना इतका आनंद झाला की, त्यांनी थेट जेसीबीने गुलाला उधळला. त्यासाठी अनेक पोती गुलाल आणण्यात आला. आनंदाच्या भरात करोना संसर्गाच्या सुरक्षिततेचे नियमही विसरले गेले.

क्लिक करा आणि वाचा-
एकीकडे फटाक्याची आतषबाजी आणि दुसरीकडे जेसीबीने कित्येक पोती गुलाल आणि पिवडी ओतली जात होती. सारा गाव एक होवून आनंदोत्सवात दंग झाला. संपूर्ण गावात ही विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे सारा गावच गुलाल आणि पिवडीने न्हावून गेला. त्यांच्या या विजयोत्सवी मिरवणुकीची चर्चा साऱ्या जिल्ह्यात सुरू आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here