मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात एकूण ८ हजार २९६ नव्या बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या काहीशी घटली आहे. आज एकूण ६ हजार ०२६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १७९ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. (maharashtra registered 8296 new cases in a day with 6026 patients recovered and 179 deaths today)

आजच्या १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १८ हजार २३७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ५९८ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १३ हजार ८०६ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ४६५, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ९३९, रत्नागिरीत ३ हजार ४९८, रायगडमध्ये ३ हजार ९५२, सिंधुदुर्गात ३ हजार ३३०, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २८९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४७७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

यवतमाळमध्ये फक्त २० सक्रिय रुग्ण

या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ८२७, नांदेडमध्ये ही संख्या ४५८ इतकी आहे. जळगावमध्ये ८०७, तसेच अमरावतीत ही संख्या २९२ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २० इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

५,८५,५८० व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ३८ लाख ८०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१ लाख ४९ हजार २६४ (१४.४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ४ हजार ७३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here