लंडन: जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाची खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाचा महिले एकेरीमध्ये पराभव करत विम्बल्डनचे विजेतेपद( Win Wimbledon) मिळवले. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत बार्टीने प्लिस्कोवाचा ६-३, ६-७, ६-३ असा पराभव (Ashleigh Barty beats Karolina Pliskova) केला. बार्टीचे हे विम्बल्डनचे पहिले विजेतेपद ठरले आहे. ही लढत १ तास ५६ मिनिटे चालली.

वाचा-

बार्टीच्या करिअरमधील हे दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. याआधी बार्टीने २०१९ साली फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले होते. इव्होनो गुलागोंलने १९८० साली ऑल इंग्लंड क्लबमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियाची महिला आहे. इव्होनो गुलागोंलने१९७१ साली पहिल्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर जो ड्रेस घातला होता तसाच ड्रेस बार्टीने घातला होता.

वाचा-

वाचा-

२५ वर्षीय बार्टी एका दशकापूर्वी विम्बल्डनच्या ज्युनिअर स्पर्धेची विजेती होती. २०१४ साली थकव्यामुळे तिने दोन वर्ष टेनिसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बार्टीने पुन्हा एकदा कोर्टवर पाऊल ठेवले.

वाचा-

चेक प्रजासत्ताकची प्लिस्कोवा याआधी दोन वेळा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण दोन्ही वेळा तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१६ मध्ये तिचा अमेरिकन ओपनमध्ये पराभव झाला होता. २०१२ नंतर प्रथमच विम्बल्डनमध्ये महिला एकेरीच्या फायनलचा निकाल तीन सेटमध्ये लागला.

बार्टी माजी क्रिकेटपटू

अॅश्ले बार्टी व्यवसायिक क्रिकेटपटू होती. तिने महिला बॅग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट आणि क्वीसलँड फायल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here