म. टा. वृत्तसेवा, वसई

गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता झालेले ९० वर्षीय वृद्ध मृतावस्थेत सापडले आहेत. त्यांचा मृतदेह येथील उघड्या गटारात सापडला असून गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून आजोबांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळं मोठ्या शहरांतील उघड्या गटारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाचा:

कृष्णा कुपेकर हे ९० वर्षीय वृद्ध बेपत्ता असल्याची नोंद १५ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विरार पश्चिम यशवंत विहार म्हाडा परिसरात ५ दिवसांनंतर गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, अर्नाळा पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढण्याचे काम गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. या परिसरात गटाराचे काम सुरू आहे, त्याचे चेंबरही बांधण्यात आले आहेत. मात्र ते उघडेच आहेत. महापालिकेनं किंवा कंत्राटदारानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सूचना फलक लावलेला नव्हता. त्यामुळे फुटपाथवरून चालताना उघड्या गटारात पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

वाचा:

या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फूटपाथचं काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here