वाचा-
आयसीसीपासून जगभरातील महान खेळाडूंनी हरलीनचं कौतुक केलं आहे. प्रतिभावान खेळाडू असलेली हरलीन जशी मैदानावर आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, तशीच ती आपल्या सौंदर्यानंही वेडं करत आहे. 23 वर्षीय हरलीन सोशल मीडियावरही कमालीची अॅक्टिव्ह असते. अधूनमधून ती आपले फोटो सोशल मीडियात शेअर करत असते.
वाचा-
सर्वोत्तम कॅच
सौंदर्याच्या बाबतीत हरलीन बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहे. अनेकांना तिने आपल्या सौंदर्याची भूरळ पाडली आहे. क्रिकेटमधील नॅशनल क्रश असलेल्या स्मृती मंधानानंतर हरलीनचा नंबर लागतो. तिच्या चाहत्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
वाचा-
हरलीनने सोशल मीडियात फोटो अपलोड करताच लाखोंच्या संख्येत लाईक्सचा तर हजारोच्या संख्येत कमेंट्सचा पाऊस पडतो. भारताची युवा फलंदाज हरलीन जगातील सर्वात सुंदर महिला खेळाडूंमध्ये गणली जाते.
वाचा-
8 वर्षाची असताना तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली. आजूबाजूच्या लहान मुलांसोबत तसेच भावाबरोबर ती क्रिकेट खेळायची. 2019 मध्ये तिने भारतीय संघातून आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला सुरवात केली. याआधी ती हिमाचल प्रदेश क्रिकेट संघातून घरगुती क्रिकेट सामने खेळली आहे. तसेच ती चंदीगडमधील दुसरी महिला क्रिकेटपटू आहे, जिने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
वाचा-
आतापर्यंत हरलीनने भारतीय संघातून खेळताना 1 एकदिवसीय सामना खेळला आहे. तर 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी-20 मध्ये तिने एक अर्धशतकही झळकावले आहे.
वाचा-
स्टायलिश क्रिकेटपटू असणारी हरलीन फिटनेसच्या बाबतीतही खूप अॅक्टीव्ह आहे. क्रिकेटव्यतिरिक्त हरलीनला हॉकी, फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्येही रस आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times