रिओ दि जनेरो: संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका () फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं बाजी मारली आहे. ब्राझीलला १-० अशा फरकानं हरवून अर्जेंटिनानं विजेतेपदावर नाव कोरलं. तब्बल २८ वर्षांनंतर अर्जेंटिनानं हा किताब जिंकला आहे. या विजयासह अर्जेंटिनानं १५ वेळा हा किताब जिंकण्याच्या उरुग्वेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) आणि नेमारचा (Neymar) संघ हे पारंपरिक प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने असल्यानं संपूर्ण फुटबॉल जगताचे डोळे या सामन्याकडं लागले होते. हा सामना अपेक्षेप्रमाणे चुरशीचा झाला. पहिली २० मिनिटे दोन्ही संघांकडून एकमेकांना कडवा प्रतिकार सुरू होता. त्यामुळं कोणालाही गोलपोस्टपर्यंत पोहोचता आलं नाही. मात्र, २२ व्या मिनिटाला एंजल डी मारिया हा आपले नाव सार्थ ठरवत देवदूताप्रमाणे संघाच्या मदतीला धावला. त्यानं पहिला गोल करत अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी ब्राझीलला अखेरपर्यंत तोडता आली नाही.

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. क्लब फुटबॉलमध्ये अनेक किताब जिंकणारा मेस्सी देशाला कोणतीही मोठी स्पर्धा जिंकून देऊ शकला नव्हता. कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयामुळं त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.

वाचा:

यापूर्वी अर्जेंटिनानं १९९३ साली ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनानं मेक्सिकोचा २-१ असा पराभव केला होता. त्यानंतर ब्राझीलला या स्पर्धेत यश मिळवता आलं नव्हतं. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांची ही प्रतीक्षा यंदाच्या विजयानं संपली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here