वाचा:
गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणातील आपल्या गावी जातात. यावर्षी कोकण रेल्वेने ७२ अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरू होताच काही दिवसांतच बुकिंग फुल्ल झाले. मात्र, बरेच चाकरमानी अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सोडण्यात आलेल्या गाड्या कमी आहेत. २०१९ ला कोकण रेल्वेवर २१० फेऱ्यांची सोय करण्यात आली होती. रेल्वे गाड्यांना ६४७ अतिरिक्त डबेही जोडण्यात आले होते. त्या वर्षी तिकिटांच्या ज्यादा बुकिंगसाठी ११ टपाल खात्यांत, १७ रेल्वे स्थानकांमध्ये पीआरएस सिस्टम आणि १६ ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
वाचा:
आशिष शेलार यांनी पुणे दौऱ्यावर असलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन या बाबी त्यांच्या निदर्शनास आणल्या. २०१९ प्रमाणेच यंदाही अधिकच्या बुकिंग सुविधा व अजूनच्या काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करून देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत, अशी विनंती शेलार यांनी दानवे यांच्याकडं केली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक व योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times