सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर हे साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ओळखले जातात. वयाच्या १७ व्या वर्षापासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी लिहिलेली ‘ठेव तू मनातल्या मनात’ ही कविता यांनी वाचली. ही कविता वाचून त्यांनी नानिवडेकर यांची पाठ थोपटली. ही तर गझल आहे, असं सुरेश भट त्यांना म्हणाले. भटांच्या या शाबासकीनंतर ते गझल या काव्यप्रकाराकडे वळले. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता. गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी नानिवडेकर यांच्या गझला अनेक कार्यक्रमांमध्ये सादर केल्या आहेत.
वाचा:
गझल क्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे नानिवेडकर हे व्यवसायानं पत्रकार होते. दैनिक पुढारीमध्ये त्यांनी उपसंपादक पदाची जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. नवी मुंबईतील वाशी इथं झालेल्या ९ व्या अखिल भारतीय गझल संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. सिंधुदुर्गातील दिवंगत साहित्यिकांचा परिचय करून देणाऱ्या ‘साहित्य सिंधू’ या पुस्तकाचं संपादन त्यांनी केलं होतं. ‘चांदणे नदीपात्रात’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times