नांदेड : पालघरनंतर आता नांदेडमध्येही भूकंपाचे हादरे बसले असल्याची माहिती समोर येते आहे. नांदेड परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून आज सकाळी साडेआठ वाजताच्या गावात भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. यामुळे बराच वेळ घरांचे पत्रेही हलत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसमत शहरासह तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू असून नागरिकांनी घाबरून न जाण्याच्या सूचना तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हादऱ्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील गुंज, पांगरा शिंदे, शिवपुरी, टाकळगाव, इंजनगाव, गिरगाव, कुरूंदा, इंजनगाव, म्हातारगाव, महागाव, बोराळा, डोणवाडा, सुकळी, सेलू, अंबा, कौठा, खुदनापुर, किन्होळा सह वसमत या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले.

अर्धापूर तालुक्यात आणि नांदेड शहरातील तरोडा नाका, सांगवी अशा अनेक भागात जमिन हलल्याचे जाणवले. मात्र, कुठलही नुकसान झालं नाही. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर येथे भुकंपाचा केंद्र बिंदु आहे आणि त्याची तीव्रता 4.4 रिस्टरस्केल असल्याची माहिती दिली आहे.

या भुकंपाची तीव्रता आपल्याकडे फारशी नाही तरीही प्रशासनाकडून सतर्कता घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालया मार्फत दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here