खरंतर, प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमधील (25) भाजपच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या 49 समर्थकांनी वेगवेगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे.
मोदी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना मंत्रिपद देण्यात येईल, असं बोललं जात होतं. त्या तरुण असून डॉक्टरही आहे. परंतु प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आले. यामुळे संतप्त होऊन पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे समर्थक राजीनामा देत आहेत.
जे.पी. नड्डा यांच्यासमोर पंकजा मुंडे आपली नाराजी दाखल करतील?
पंकजा मुंडे जे.पी. नड्डा यांना भेटून नाराजी व्यक्त करतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यावेळी प्रीतम मुंडे या मंत्रीपदासाठी पात्र असूनही त्यांना मंत्री का केले गेले नाही? असा सवालही करतील अशी चर्चा आहे.
पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
येत्या मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईत या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वरळीतील कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी पंकजा मुंडे समर्थकांशी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. समर्थकांची समजूत काढण्यात पंकजा मुंडे यांना यश येतं का हेदेखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times