या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एसबीआय म्युच्युअल फंडाकडून देण्यात येत आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांना पहिल्या टप्प्यात ९१२२ कोटींचा परतावा देण्यात आला होता. यातील दुसरा हप्ता १२ एप्रिल २०२१ च्या आठवड्यात गुंतवणूकदारांना वितरित करण्यात आला होता. दुसऱ्या हप्त्यात २९६२ कोटी वितरित करण्यात आले होते. ३ मे २०२१ च्या आठवड्यात कंपनीने तिसरा हप्ता २४८९ कोटी गुंतवणूकदारांच्या खात्यात वर्ग केले होते. ७ जून २०२१ च्या आठवड्यात कंपनीने चौथा हप्ता म्हणून ३२०५ कोटी गुंतवणूकदारांने वितरित केले होते.
फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये सहा योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना ९१२२ कोटी परत करण्यात आले होते. एकूण चार हप्ते गुंतवणूकदारांना निधी पार्ट करण्यात आला आहे. आता एसबीआय म्युच्युअल फंडाकडून परताव्याचा पाचवा हप्ता लवकरच अदा करण्यात येईल, सर्व सहा योजनांमधील गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पैसे मिळून जातील, असे कंपनीने म्हटलं आहे. जुलै महिन्यातील एनएव्हीनुसार पैसे पार्ट केले जातील, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
डेट म्युच्युअल फंडातील फ्रॅंकलिन इंडिया लो ड्युरेशन फंड, फ्रॅंकलिन इंडिया डायनॅमिक अॅक्रुअल फंड, फ्रॅंकलिन इंडिया क्रेडीट रिस्क फंड, फ्रॅंकलिन इंडिया शाॅर्ट टर्म इन्कम प्लान, फ्रॅंकलिन इंडिया अल्ट्रा शाॅर्ट बाँड फंड आणि फ्रॅंकलिन इंडिया इन्कम अपाॅर्च्युनिटीज फंड या सहा गुंतवणूक योजना गेल्या वर्षी तात्काळ बंद केल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times