हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवस कोकण (Konkan) आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस होणार आहे. इतकंच नाहीतर पुढील तीन तासात घाट परिसरात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होईल.
राज्यात मराठवाड्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना या भागातही जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या तीन दिवसांत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरतील. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. हवामान खात्याकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या पाच दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा असून पहिले तीन दिवस ढगाळ वातावरण असेल पण नंतर कोकणात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुढच्या दोन दिवसांत राज्यात पाऊस दमदार हजेरी लावेल. तर आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times