महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आघाडीतील तिन्ही पक्षांना आपापले पक्ष वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्या दृष्टीने आम्ही काम करतही असतो. यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. शिवसेने स्वबळाचा नारा दिला आहे असे मला कुठेही दिसत नाही, असे सांगतानाच शक्य होईल तितक्या निवडणुका आम्ही एकत्रित लढणार आहोत, असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘विधानसभाध्यक्ष काँग्रेसचाच होणार’
विधानसभा अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर देखील त्यांनी भाष्य केले. शिवसेनेने विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केलेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसचाच उमेदवार असणार आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले. याबरोबरच वन खाते देखील रिक्त नाही. हे खाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने कामाला चांगली गती आहे, असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
भाजप नेत्यांकडून होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या भाष्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांना काही ना काही घोषणा करायची असते. पण त्यांची घोषणा कधी साकार होत नाही. मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चालले आहे आणि आणखी तीन वर्षे हे सरकार पूर्ण करेल. इतकेच नाही तर राज्यात निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी सरकार आले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे सांगत त्यांनी पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सूचित केले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times