पुणे: महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेला ईडीच्या चौकशीचा ससेमिरा हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. राज्यातील सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेत्यांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. आता मनसेचे अध्यक्ष यांनीही या संदर्भात भाष्य केलंय. ( Over ED Inquiry)

पुण्यातील नवी पेठ येथील मनसेच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज राज ठाकरेंच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापराबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय हे खरं आहे. पण काँग्रेसचं सरकार असतानाही हे झालं आहे. आता भाजपही तेच करतोय. केंद्रीय यंत्रणांचा वापर बाहुलं म्हणून होऊ नये. तुम्हाला जो माणूस नको आहे त्याला संपवायचं म्हणून ईडीचा वापर करायचा, हे अत्यंत चुकीचं आहे. ज्यांनी खरेच गुन्हे केले आहेत ते मोकाट फिरत आहेत,’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

वाचा:

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले यांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमिरा लागला आहे. भोसरी येथील भूखंड प्रकरणात नुकतीच ईडीच्या अधिकाऱ्यांकडून खडसेंची चौकशी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतानाच काही कार्यकर्त्यांनी खडसेंना याबाबत सावध केलं होतं. पक्ष सोडलात तर तुमच्यामागे ईडी लागेल, अशी भीती खडसेंच्या समर्थकांनी व्यक्त केली होती. त्यावर, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं खडसे म्हणाले होते. राज ठाकरे यांना आज खडसेंच्या चौकशीबाबत विचारलं असता, ‘मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय,’ असा सूचक टोला त्यांनी हाणला.

‘पुण्यात राहायला आलो तर मी राज मोरे होईन का?’

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. ‘विमानतळाची जागा बदलली म्हणून नाव बदलेल का? मी पुण्यात स्थायिक झालो तर राज मोरे होईन का? राज ठाकरेच राहणार,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here