सिंधुदुर्ग : कोकणात राजकीय समीकरण पहाता नारायण राणे म्हणजे कोकण अस समीकरण तर शिवसेना म्हणजे कोकण अशी समीकरणे आहेत नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय केबिनेट मंत्री म्हणून संधी देताच राज्यात मुख्यत्त्वे कोकणात राणे विरुद्ध सेना असा वाक्य चातुर्य रंगू लागलंय सिंधुदूर्गने राडे अनेक वेळा पाहिलेत. मात्र, आज सेना आणि राणे यांच्यातील राजकीय कलगीतूरा नेहमी रंगलेला दिसतो. पण आज सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेगुर्ले येथील नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने सर्वच विरोधी व सत्ताधारी एकत्रित दिसले आणि आज काही वेगळं घडलं.

वेगुर्ले नगरपरिषदेच्या सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वेगळा अनुभव व्यासपीठावर पहायला मिळाला. यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते.

राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमीच पहायवास मिळते मात्र या वेळी एकत्र चित्र. नितेश राणे आणि विनायक राऊत हे कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहिर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की पुन्हा रंगेल.वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी भाषणातून दिलेत.

नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहिर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात असं सांगितलं.

लोकार्पणाच्या भाषणात लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी सर्वचे नेत्यांनी कोकणाच्या विकासासाठी एकत्र येण्याची सल्ला दिला. आणि नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश राणेंनी दिला. सेना आणि राणे यांचा राजकारणात पटत नाही. नाराय़ण राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्याच जिल्ह्यातील मोठ्या कार्यक्रमात सेना आणि भाजप किंबहुना राणे व सेना एकत्र आले. हे एकत्र येणं वेगळ्या राजकारणाची नांदी तर नाही ना अशी राजकीय चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here