आजच्या १५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर सरकला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख १२ हजार ४७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के एवढे झाले आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार १६५ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १९ हजार ०३४ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ६२६ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १३ हजार १५७ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ७१७, साताऱ्यात ही संख्या ८ हजार ५०५, रायगडमध्ये ४ हजार ३२५, रत्नागिरीत ३ हजार ५६९, सिंधुदुर्गात ३ हजार ५२४, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ६५२ इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार ३०१ इतकी झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times