म.टा.प्रतिनिधी,

पवना धरणातील श्री.वाघेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर पवना धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात घडली. (A )

शुभम सुरेश दुधाळ (वय- २१, रा.राजीव ग‍ांधीनगर, खडकी, पुणे) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व त्याचा भाऊ संकेत यांच्यासह सहा मित्र रविवारी सकाळी तुंग किल्ला येथे फिरण्यासाठी आले होते. त्यानंतर ते दुपारी १२ च्या सुमारस पवना धरणातील श्री. वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवनाधरणात पोहण्यासाठी उतरले असता पोहत असताना शुभमला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला.

क्लिक करा आणि वाचा-
त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने अनेक जण मदतीसाठी धावून गेले. मात्र कोणालाच पोहता येत नसल्याने काहीच उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन स्थानिक युवक रोहित उर्फ छोट्या जाधव, अक्षय उंबरकर, रमेश गोणते, तानाजी घारे यांच्या मदतीने शोधकार्य सुरू कले व दोन तासांनी बुडालेल्या तरूणाला बाहेर काढण्यात यश आले.

क्लिक करा आणि वाचा-

घटना स्थळाच्या पोलिस हद्दीमुळे मदत कार्यात हद्दिचा अडथळा

युवक बुडाल्यानंतर घटनास्थळी लोणावळा ग्रामीणचे पोलिस तातडीने दाखल झाले होते. मदत कार्य देखील सुरू करण्यात आले होते. मात्र ज्या ठिकाणी युवक बुडाला ती हद्द वाघेश्वर गावची असल्याने ती वडगाव पोलिसांची असल्याचे समजल्यानंतर येथे वडगाव पोलिसांना पंचनाम्यासाठी बोलवले गेले व यानंतर एक तासाने वडगाव पोलिस येथे दाखल झाले.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी लोणावळा ग्रामीणचे पोलिस नाईक विजय गाले, रफीक शेख, सुनिल गवारी, भिमराव वाळुंज, श्रीकांत घरादळे तर वडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक संतोष चामे, पोलिस हवालदार अजित ननवरे, पोलिस हवालदार आशिष काळे उपस्थित होते. या घटनेचा पुढील तपास वडगाव पोलिस करत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here