मुंबई : मुंबईत जन्मदर कमी झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. इतकंच नाहीतर करोना संसर्गामुळे जन्मदर कमी होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. मुंबईत करोनाचा संसर्ग खूप असल्याने इथे कडक लॉकडाऊन होते, तेव्हा मोठ्या संख्येने लोक आपल्या कुटूंबियांसह शहराबाहेर गेले. यामुळे, २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये जन्मदर जवळपास २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०१५ नंतर प्रथमच जन्मदरात घट दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, करोना संसर्गामुळे जन्मदर घटल्याचे पुरावेही समोर आले आहेत. या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये येथे १ लाख ७४ हजार मुले जन्माला आली. यानंतर २०१६ मध्ये येथे १ लाख ५२ हजार मुले जन्माला आली. म्हणजेच ही संख्या २१ हजार ९५० वर खाली आली आहे. त्यानंतर थोडीशी घट झाली तर कधी थोडी वाढही झाली. २०१९ मध्ये मुंबईत १ लाख ४८ हजार मुले जन्माला आली.

करोना वाढला, जन्मदर घसरला
२०२० मध्ये जन्मदरात सर्वात मोठी घट दिसून आली. म्हणजेच यावर्षी ४२ हजार कमी मुले जन्माला आली. २०१९ च्या तुलनेत अशाप्रकारे २०२० मध्ये मुंबईत जन्मदर २६ वर घसरला. २०२० मध्ये जन्मलेल्या मुलांपैकी ५२ टक्के मुले आणि ४८ टक्के मुलींचा जन्म झाला. २०१९ मध्ये मुलाची संख्या ४७.२३ टक्के होती आणि मुलींची संख्या ४४.२८ टक्के होती.

२०१५ मध्ये मुंबईत होम डिलीव्हरीची संख्या १४६५ होती. नंतर २०१९ मध्ये ती कमी होत ३५३ झाली. २०२० मध्ये यामध्ये आणखी घट झाल्याचं समोर आले. यावर्षी फक्त २५६ महिलांची होम डिलीव्हरी झाली आहे. मुंबईत दरवर्षी सुमारे दीड लाख बाळांचा जन्म होतो. लॉकडाऊन दरम्यान अनेक कुटुंबे येथेच राहिली. कामगार आपापल्या गावी गेले. परिस्थिती सुधारल्यावर ते मुंबईत परतले, पण त्यांचे कुटुंब त्यांच्याबरोबर परत आली नाहीत. त्यामुळे मुंबईत प्रसूती कमी झाली आणि जन्मदरात घट नोंदली गेली, असे पालिकेचे म्हणणे आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here