करोनाच्या वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच दुकाने उद्यापासून पुन्हा बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सराफ व्यापारी संघाच्या इमारतीमध्ये सराफी व्यावसायिक व महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये गायकवाड बोलत होते.
क्लिक करा आणि वाचा-
ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली आज बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. फक्त शहर नाही तर ग्रामीण भागातही गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा भार पॉझिटिव्हिटी रेट वाढण्यावर होत आहे. अगदी वीकेंड लॉकडाउनचाही पूर्णता फज्जा उडल्याचे दिसते. पॉझिटिव्हिटी रेट कमी करावयाचा असेल तर सगळेच व्यवसाय, उद्योग बंद करा. हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध सोडून बाकी सर्व बंद करा तरच रेट कमी येईल. असे करावयाचे नसेल तर सराफ व्यावसायिकांसह सर्वच दुकानदार उद्यापासून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत शासनाच्या नियमांचे पालन करून दुकाने सुरू करतील.
क्लिक करा आणि वाचा-
यावेळी सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक संजय जैन, शिवाजी पाटील, ललित गांधी, प्रसाद कालेकर, किशोर परमार आणि सभासद उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times