सांगली जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे १९ जुलैपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ( extended till July 19)
कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये १ ते ५ स्तर मध्ये विभागले आहे. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त RTPCR चाचणी अहवालानुसार कोविड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना आहेत. दि. ९ जुलै २०२१ रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड-१९ पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा जास्त व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच राज्य शासनाकडील आदेशान्वये कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधाविषयी निर्णय घेत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लगतच्या दोन आठवड्याचा RTPCR चाचणीचा पॉझीटीव्हीटी दर विचारात घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर ४ प्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास दि. १९ जुलै २०२१ रोजीचे पहाटे ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सांगलीत आज आढळले करोनाचे २५२ नवे रुग्ण
दरम्यान, सांगलीत करोनाचे नवे रुग्ण वाढतच असून येथे अजूनही नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नाही. सांगलीत आज दिवसभरात करोनाचे एकूण २५२ रुग्ण आढळून आले आहेत. या बरोबरच सांगलीत ज्यांवर उपचार सुरू आहेत, अशा करोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ७१७ इतकी झाली आहे. काल ही संख्या ११ हजार ४६५ इतकी होती.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times