नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक आज विम्बल्डनची फायनल बघायला गेले होते. शास्त्री यांचे बरेच फोटो यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण चाहत्यांनी यावेळी रवी शास्त्री यांना ट्रोल केल्याचेच पाहायला मिळाले.

रवी शास्त्री ट्रोल का झाले, जाणून घ्या…रवी शास्त्री यांना विम्बल्डनच्या फायनलमध्ये चाहत्यांमध्ये बसलेले पाहून पहिल्यांदा तर चाहत्यांना धक्का बसला. पण त्यानंतर शास्त्री यांचे जे हावभाव पाहायला मिळाले, त्यावरुन त्यांना चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. रवी शास्त्री यांना क्रीडा विश्वात बहुतांशी चाहते ओळतात. त्यामुळे विम्बल्डनच्या फायनल पाहण्यासाठी आल्यावर त्यांना आपल्याला लोकं ओळखतील आणि चांगली प्रसिद्धीही मिळेल, असे वाटले होते. पण तसे घडलेच नाही. उलट विम्बल्डन सुरु असताना त्यांच्याकडे शेजारी बसलेल्या व्यक्तीनेही ढुंकून पाहिले नाही आणि त्यांचा हाच फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढे मोठे पद असूनही आपल्याला कोणीही भाव देत नाही, असेच रवी शास्त्री यांना वाटत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे. एकिकडे खेळाडूंचे फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्यांना प्रसिद्धी मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण आज मात्र शास्त्री यांना तसा अनुभव न आल्याचेच पाहायला मिळाले.

फायनलमध्ये नेमकं काय घडलं, पाहा…सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने रंगतदार झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात माटेओ बेरेटिनीवर दिमाखदार विजय मिळवला आणि जेतेपदाला गवसणी घातली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत बेरेटिनीला ६-७, ६-४, ६-४, ६-३ असे पराभूत करत विजेतेपद पटकावले. जोकोव्हिचचे हे २०वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे. पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच आणि माटेओ बेरेटिनी यांची ६-६ अशी बरोबरी झाली आणि सामना टाय ब्रेकरमध्ये गेला होता. टाय ब्रेकरमध्ये माटेओ बेरेटिनीने अप्रितम खेळत करत जोकोव्हिचवर मात केली आणि पहिला सेट ७-६ असा जिंकला. अंतिम फेरीच्या पहिल्या सेटमध्ये सर्वांनाच जोरदार धक्का बसला होता. कारण जोकोव्हिच हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण पहिला सेट जोकोव्हिचने गमावला आणि सामन्याची रंगत वाढली. पण त्यानंतर सलग तीन सेट्स जिंकत जोकोव्हिचने जेतेपद पटकावले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here