कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव यांच्या नावावर एकमत झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळाले असून पक्षाचे शाहूवाडीतील सदस्य विजय बोरगे यांना संधी मिळणार असल्याचे संकेत आहेत. (finally the goes to the congress; name is decided)

पन्हाळा येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मंगळवारी, ता. १२ जुलै रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. महाविकास आघाडीकडून सकाळी ११ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
महाविकास आघाडीचे सदस्य सध्या पन्हाळा येथे सहलीवर आहेत. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, स्वाभिमानीचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींची बैठक झाली. इच्छुकांची मते जाणून घेतली. सदस्यांशी संवाद साधला.

क्लिक करा आणि वाचा-
दोन्ही काँग्रेसकडून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मातब्बर मंडळी इच्छुक होती. शिवाय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा सांगितला होता. मुश्रीफ यांचे विश्वासू व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. याशिवाय राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, विजय बोरगे यांची नावे चर्चेत होती. काँग्रेसकडून राहूल पाटील, भगवान पाटील, सरिता शशिकांत खोत, पांडूरंग भादिंगरे यांच्या नावाचा समावेश होता.

क्लिक करा आणि वाचा-
आमदार पी. एन. हे चिरंजीव राहुल पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील राहिले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. अडीच-तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्याप्रसंगी आमदार पाटील यांनी पवार यांची भेट घेऊन अध्यक्षपदाबाबत चर्चा केली होती. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचाली वेगावल्यानंतर पी. एन. यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केली. पन्हाळा येथे झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. अधिकृत नावे सोमवारी, सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहेत.

प्रकाश आवाडेंनी जाहीर केला पी. एन. यांच्या मुलाला पाठिंबा

आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीचा राहील असे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केले आहे. ताराराणी आघाडीचे दोन्ही सदस्य सभागृहात हजर राहून राहुल पाटील यांना पाठिंबा देतील असे आमदार आवाडे यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here