लंडन : गेली बरीच वर्षे इंग्लंड युरो चषक स्पर्घेत खेळत असला तरी आतापर्यंत त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. पण अंतिम फेरीत दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडने महत्वपूर्ण गोल करत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंड ५५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. 55 वर्षांपूर्वी म्हणजे 1966 मध्ये इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला होता. त्यानंतर आतापर्यंत इंग्लिश संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. युरो कपच्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना युरोपमधील इटली या सर्वात यशस्वी संघांशी होत आहे.

युरोचा अंतिम सामना सुरु झाला आणि दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ याने शानदार गोल केला. या गोलनंतर इंग्लंडच्या संघाची मानसीकता बदललेली पाहायला मिळाली. कारण त्यानंतर इंग्लंडने आक्रमक खेळ केला आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्यांनी इटलीला गोल करण्यासाठी संधी दिली नाही. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. 1990 आणि 2018 च्या विश्वचषक स्पर्धेशिवाय इंग्लिश संघाला 1996च्या युरो चषक उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. संघाचे प्रशिक्षक गॅरेथ साउथगेटने 2018 पासून मोठ्या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंना तयार करण्याचे काम केले आहे. त्यामुळे साउथगेटचे चेले अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतात, ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्री-क्वॉर्टर फायनलमध्ये इंग्लंडने जर्मनीचा 2-0 ने पराभव केला होता. क्वॉर्टर फायनलमध्ये युक्रेनला 4-0ने पराभूत केले होते, तर सेमी फायनलमध्ये डेन्मार्कला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण इटलीचा संघ आता आक्रमक करून सामन्यात १-१ अशी बरोबरी करण्यासाठी उत्सुक असेल. त्यामुळे आता इटलीच्या आक्रमणाचा सामना इंग्लंडचा संघ कसा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ अजून गोल करुन आपली आघाडी वाढवणार का, याची उत्सुकताही सर्वांना असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here