नवी दिल्ली : ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने ‘बिलिव्ह’ नावाचे पुस्तक लिहिले आहे, जे नुकतेच प्रकाशित झाले. यामुळेच तो सध्या चर्चेतही आला आहे. न्यूज 24 स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला की, ‘कर्नाटकातील देवदत्त पड्डिकल, महाराष्ट्रातील ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल यांनी मला दखल घ्यायला भाग पाडलं आहे. अक्षर पटेलने कठोर परिश्रम घेत स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची कमतरता संघाला कधीच भासू दिली नाही.’

यावेळी रैनाने रिषभ पंतचे नाव घेतले नाही. याबाबत विचारले असता रैना म्हणाला की, रिषभ आता वरिष्ठ खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. तो आता फक्त षटकार मारत नाही, तर चौकारही ठोकतो.

रैनाने मानले द्रविडचे आभाररैनाने यावेळी मोहम्मद सिराजचा विशेष उल्लेख केला. तसेच भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि एनसीएचे अध्यक्ष राहुल द्रविड यांचेही आभार मानले. रैना म्हणाला की, ‘राहुल द्रविड यांनी 19 वर्षाखालील खेळाडूंना घडविण्यात खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळेच त्यांनी घडवलेले अनेक खेळाडू आपल्याला वरिष्ठ संघात दिसतात.’ रैनाने उत्तर प्रदेशच्या प्रियम गर्ग, कर्ण शर्मा आणि पंजाबच्या अभिषेक शर्मा यांचीही नावे घेतली. या खेळाडूंमध्येही चांगल्या खेळाडूंचे गुण दिसत असल्याचे तो म्हणाला.

क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट खेळणाऱ्यांची काही कमी नाही. अनेक दर्जेदार क्रिकेटपटू इथे घडले, सध्या आहेत आणि पुढेही होतील. आयपीएलसारख्या स्पर्धांमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी धडपडत असतो. भारताच्या युवा खेळाडूंनी गेल्या काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. आयपीएल असो किंवा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत हरवणं असो. 2021 मध्ये इंग्लंडला घरच्या मैदानात धूळ चारली होती.

टीम इंडियातील अनेक युवा खेळाडूंनी अनेक दिग्गज आजी-माजी खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनालाही या तरुण खेळाडूंनी प्रभावित केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयाचा नायक ठरलेल्या अक्षर पटेलच्या कामगिरीमुळे रैना खूप खूश झाल्याचे दिसत होता. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी रैनाने धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात सीएसकेकडून खेळताना दिसेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here