लंडन : पेनेल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर इटलीने ३-२ असा विजय साकारला आणि इंग्लंडला पराभूत करत त्यांनी युरो चषकाला गवसणी घातली. युरो चषकाची अंतिम फेरीत इंग्लंड आणि इटली यांच्यातील सामना चांगलाच थरारक झाला. ९० मिनिटांच्या खेळात दोन्ह संघांनी १-१ अशी बरोबरी केली होती. अतिरीक्त वेळेच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना दोल करण्यात अपयश आले होते. त्यानंतरचा खेळ हा चांगलाच आक्रमक झाला आणि दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या अंतिम फेरीच्या दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडच्या ल्यूक शॉ याने शानदार गोल केला. या गोलनंतर इंग्लंडच्या संघाची मानसीकता बदललेली पाहायला मिळाली. कारण त्यानंतर इंग्लंडने आक्रमक खेळ केला आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्यांनी पहिल्या सत्रात इटलीला गोल करण्यासाठी संधी दिली नाही. अंतिम फेरीत दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडने महत्वपूर्ण गोल करत १-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत त्यांनी ही आघाडी कायम ठेवली होती आणि इटलीला गोल करण्यापासून लांब ठेवले होते. दुसऱ्या सत्रात इटलीने जोरदार आक्रमण केले, पण त्यांना यश मिळाले ते ६७व्या मिनिटाला. कारण सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला लिओनार्डो बनुचीने भन्नाट गोल केला आणि संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळेच सामना अतिरीक्त वेळेत गेला होता. अतिरीक्त वेळेमधील १५ मिनिटांच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करताना अपयश आले आणि त्यामुळेच अतिरीक्त वेळेचे दुसरे सत्र चांगलेच रंजकदार ठरले.

अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना जोरदार आक्रमण केले, पण यावेळी कोणालाही यश मिळाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे सामना पेनेल्टी शूटआऊटपर्यंत गेला. इटलीच्या संघाना या युरोमध्येच पेनेल्टी शूटआऊटमध्ये सामान जिंकला होता. त्यामुळे इटलीचा संघ पेनेल्टी शूटआऊटमध्ये इटलीचा संघ नेमकी कशी रणनिती आखतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ पेनेल्टीमध्ये जादुई कामगिरी करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here