वाचा:
मधुमेह, हायपर टेन्शन आणि हृदयविकार या आजारानं त्रस्त असलेल्या नवीन कुमार (बदललेले नाव) यांना दोन दिवसांपासून पोटात अत्यंत वेदना होत होत्या. त्यामुळं त्यानं रोजची कामं करणंही अशक्य झालं होतं. त्यांना उभंही राहता येत नव्हतं. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी नवीन कुमार यांना मॅग्नेटिक रेसोनन्स कॉलॅन्जियो पॅनक्रिएटोग्राफी (एमआरसीपी) करण्याचा सल्ला दिला. ही चाचणी केल्यानंतर त्यांच्या पित्ताशय नलिकेमध्ये मृतावस्थेतील जंत आढळून आले आणि कॅल्क्युलस कोलेसायटिसिस असल्याचे निदान झाले. निदान झाल्यानंतर त्यांच्यावर ईआरसीपी करण्याचा निर्णय झाला. औषधे देऊन त्यासाठी त्यांची पूर्वतयारी करण्यात आली. त्यानंतर मृत जंतांचे तुकडे बलून एक्स्ट्रॅक्टर या विशेष उपकरणाने काढण्यात आले. या प्रकियेनंतर रुग्णाच्या वेदना थांबल्या.
वाचा:
सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या आतड्यामध्ये जंत आढळून येतात, पण क्वचितच ते पित्ताशय नलिकेत आढळून येतात. महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या एकूण रुग्णांपैकी १.२% रुग्णांमध्ये जंत पित्ताशय नलिकेत आढळून येतात. कच्चे आणि न शिजलेले दूषित अन्न आणि पाण्यामुळे अशा प्रकारचे जंत होऊ शकतात. नवीन कुमार यांच्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे. वेळीच उपचार झाले नसते तर त्यांच्या पित्ताशय नलिकेमध्ये किंवा यकृतामध्ये संसर्ग झाला असता. वयाचा विचार करता हा संसर्ग घातक ठरला असता,’ असं डॉक्टरांनी सांगितलं.
काय असते ईआरसीपी?
पित्ताशय नलिकेतील परजीवी (जंत) शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी एण्डोस्कोपिक रेट्रोग्रेड कॉलॅन्जियो-पॅनक्रिएटोग्राफी (ईआरसीपी) केली जाते. एक निमुळता, लवचिक स्कोप तोंडावाटे लहान आतड्यापर्यंत पोहोचविला जातो. तिथं विशेष उपकरण पित्ताशयाच्या नलिकेत टाकून जंत बाहेर काढले जातात. ईआरसीपीनंतर रुग्णावर सर्वसाधारणपणे एसआयएलएस कोलेसिस्टेक्टोमी (सिंगल इन्सिजन लॅपरोस्कोपिक गॉलब्लॅडर रिमूव्हल सर्जरी) केली जाते. पित्ताशयातील खड्यांच्या आजारासाठी या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. एसआयएलएस ही आधुनिक लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया आहे. ही एक छेद देऊन करण्यात येते आणि पारंपरिक लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेत देण्यात येणाऱ्या चार छेदांऐवजी बेंबीमध्ये एक छेद देण्यात येतो. टाके अंतर्गत आणि विरघळणारे असतात.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times